समविचारी संघटनांची मागणी
श्रीरामपूर दिपक कदम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी नावाच्या वकीलाने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला, तसेच अहिल्यानगर येथील फरीद खान याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहून सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात आल्याची घटना घडली.या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध करत, संबंधित समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी श्रीरामपूर येथील विविध समविचारी बौद्ध संघटनांकडून करण्यात आली आहे.
या मागणीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, जय भीम आर्मी, बहुजन टायगर फोर्स,समता सैनिक दल, भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली
पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी रिपाईचे विभागीय जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल म्हणाले की, "देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावणे हे केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय संविधानावर हल्ला आहे.
हे राष्ट्रद्रोही कृत्य असून,त्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,अन्यथा आम्ही जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडू."सुभाष त्रिभुवन म्हणाले, "यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकल्यावर संबंधित व्यक्तीवर पोलीस फिर्यादी होऊन ३०७ कलम लावण्यात आले, दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना मारणाऱ्या आरोपीवर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून तो आजही जेलची हवा खातो तर मंग न्यायमूर्तीवर हल्ला करणाऱ्याच्या बाबतीत अजूनही कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. हा दुजाभाव आम्ही खपवून घेणार नाही."
महिला नेत्या रमादेवी धीवर यांनी देखील या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्या म्हणाल्या, "महामानव बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे."यावेळी अनेक बौद्ध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी सचिन ब्राम्हणे जिल्हाध्यक्ष जय भीम आर्मी
संजय रूपटक्के अध्यक्ष (बहुजन टायगर फोर्स), डॉ. वसंत जमदाडे (माजी नगरसेवक मुक्तार शहा, हनीफ पठाण सचिव (लहुजी सेना), रॉकी लोंढे जिल्हाध्यक्ष (रिपाई जिल्हाध्यक्ष), सुगंधरा इंगळे (भारतीय बौद्ध महासभा),दादासाहेब बनकर समता सैनिक दल किशोर अभंग, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद जिल्हा अध्यक्ष दिपक कदम ॲड. मिलिंद धीवर, रोहित शेळके, सागर नावकर सुरेश ठुबे आदींचा समावेश होता.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला की, जर संबंधित दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली नाही,तर जिल्हाभर उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल.
