शरद पवारांची प्रताप सरनाईक यांच्याकडून सदिच्छा भेट

Cityline Media
0
मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीवर चर्चा
विभव बिरवटकर

मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क पुढील आठवड्यात होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.शिवसेनेने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून,या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने झालेली ही सदिच्छा भेट मात्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरू शकते,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य असून,संघटनेतील त्यांचा प्रभाव लक्षणीय मानला जातो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय गट पवारांकडे सल्ला आणि पाठिंबा मिळवण्यासाठी धाव घेत आहेत. सरनाईक यांनीही त्यांना सदिच्छा भेट देत क्रिकेट असोसिएशनच्या घडामोडींवर चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या भेटीवेळी मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक उपस्थित होते.विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातच प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ‘स्वर दीपावली’ कार्यक्रमात क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत चर्चा केली होती. शिंदे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे समजते.

शरद पवार यांच्या भेटीमुळे क्रिकेट असोसिएशन मधील समीकरणे अधिकच रंजक होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या शुभेच्छांच्या गोड वातावरणात झालेली ही भेट आता राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!