अकोले प्नतिनिधी अकोले तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी सर्वप्रथम देशाच्या मा.पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व भारतरत्न स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अनुक्रमे पुण्यतिथी व जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले तसेच काॅंग्रेस पक्षाचे नवीन कार्यालय हे सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच या कार्यालयात आल्यानंतर जनतेचे प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्नशील रहावे असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी अहिल्यानगर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन गुजर,ज्येष्ठ नेते मधुकर नवले,अकोले काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे गुरुजी.ज्ञानेश्वर झडे, रमेश जगताप, सौ. सुमन जाधव, सौ. सिता पधवे, भास्कर दराडे, विक्रम नवले आदींसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
