नाशिक महानगरपालिकेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आता पुढच्या वर्षीच

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कलजवळ ८२ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आता पुढील वर्षीच होणार आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने नियोजित उद्घाटन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या नूतन इमारतीचा शुभारंभ आता नव्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत २०२६ मध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा मजली या भव्य प्रशासकीय इमारतीपैकी तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित मजल्यांचे काम येत्या दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत करण्याची तयारी सुरू होती.

याच पार्श्वभूमीवर दि. ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन मजल्यांचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. आवश्यक दाखले आणि

परवानग्यांची पूर्तता करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होती.मात्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आयोगाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालताना स्पष्ट केले आहे, की आचारसंहिता निवडणुकीच्या क्षेत्रापुरती मर्यादित असली तरी मतदारांवर प्रभाव पडेल, असे कार्यक्रम आसपासच्या भागात घेता येणार नाहीत.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीतील काही जागा देण्यात आली आहे: मात्र ती जागा अपुरी पडत असल्याने नवीन इमारतीत काही विभाग हलवून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केले आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी या इमारतीचे पूर्ण काम पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!