झरेकाठी सोमनाथ डोळे शिर्डी येथील एमआयडीसी मधे नव्याने उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला.
ना सावंत यांचे शिर्डीत आगमन होताच त्यांचे स्वागत पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे व युवानेते सुजय विखे यांनी केले तदनंतर त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले .
त्यानंतर साई संस्थानच्या शैक्षणिक संकूलात त्यांचे हस्ते तंत्रज्ञान प्रशिक्षण व टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राचा भूमिपूजन समारंभ कळ दाबून करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे , आमदार अमोल खताळ, मा.खासदार डॉ.सुजय विखे , श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड,उपविभागीय अधिकारी माणिक आहिरे,टाटा टेक्नॉलॉजीचे सुशीलकुमार, टाटा कन्सल्टन्सीचे समन्वयक प्रितम गांजेवार,राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर,तसेच कैलास कोते,अभय शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी ही कामे मंजूर करून घेण्यासाठी डॉ.सुजय विखे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत ते म्हणाले की डॉ.सुजय विखे माझ्याकडे इतके वेळा आले की मी सुद्धा माझ्या कामासाठी कधी इतका पाठपुरावा केला नाही कार्यक्षम काम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते त्याची किंमत कालांतराने कळते.
