सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी सर्पास पकडून सोडले निसर्गात
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील
झरेकाठी येथील,श्रीकांत दाभाडे यांच्या घरामध्ये बिग साईज कॉमन कोब्रा,नागिन हा निघाल्याने दाभाडे परिवारातील सदस्यांची चांगलीच धांदल झाली.
नागिन हा सर्प त्या ठिकाणी अंदाजे उंदीर,बेडूक म्हणजेच भक्ष्याच्या शोधामध्ये आला होता,कोब्रा नागिन दिसल्यानंतर श्रीकांत महाराज दाभाडे यांनी आश्वी खुर्द येथील सर्पमित्रशिवप्रसाद पवार यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.
सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी झरेकाठी येथे येऊन. त्या ठिकाणी धाव घेत तो सर्प व्यवस्थितपणे हाताळून कैद केले.सर्पमित्र शिवप्रसाद पवार हे दाभाडे यांच्या घरी आल्यामुळे व्यवस्थितपणे कोब्रा नागिन पकडण्यात यश आल्यामुळे यावेळी कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडली नाही, याबद्दल झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचचे सदस्य ,रमेश डोळे, तुषार वाणी , प्राध्यापक गणेश वाणी, पैलवान विजय वाणी,रवींद्र वाणी,सोमनाथ डोळे, स्वप्निल वाणी,यांनी सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांचे आभार व्यक्त केले.
