प्रिंप्री लौकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा चैतन्यात.

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौंकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा मोठ्या चैतन्यदायी वातावरणात उत्साहात पार पडला.
प्रसंगी विद्येची देवता सरस्वती,पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी  विविध स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष  भाऊसाहेब मुंढे, ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब लावरे, भारत गिते, शिक्षक अशोक गिते,उपस्थित होते.

या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी भाजीपाला स्टॉल,फनी गेम्स स्टॉल विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल यांची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व शिक्षण प्रेमी पालक,ग्रामस्थ विद्यालयाचे माजी विध्यार्थी या सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग लाभला व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.उत्साहाच्या वातावरणात बाल आनंद मेळावा पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!