तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड लग्नाचे आमिष दाखवून पावणे दोन वर्षांपासून शरीर संबंधासाठी मित्राच्या घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन मुलीबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन आहे. आरोपी कार्तिक दीपक तिवडे (वय ३०) याने या मुलीशी मैत्री करून तिला सातपूर येथील रामकृष्णनगर येथे मित्राच्या घरी बोलावले.आरोपी कार्तिक तिवडे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या संबंधांबाबत कोणाला काही सांगितले,तर तुझ्या आईवडिलांसह भावाला मारून टाकीन,अशी धमकी दिली. घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र चर्वितचर्वण सुरू आहे.या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कार्तिक तिवडे विरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.
