वरवंडी संपत भोसले जिल्हा परिषद आहिल्यानगर व पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीट स्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक साकूर बिटचा कार्यक्रम नुकताच साकुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडला.या केंद्रात मांडवे केंद्र वरवंडी केंद्र साकुर व केंद्र हिवरगाव पठार केंद्रातील प्रथम प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी शाळेतील स्पर्धकांनी घवघवीत यश मिळवले.यामध्ये समूहगीत गायन स्पर्धेमध्ये सामना बालगटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.तसेच कथा व गोष्ट सादरीकरण (बाल गट)या स्पर्धेमध्ये कु.संघमित्रा संदिप मेहरखांब हिचा प्रथम क्रमांक आला आणि तालुका पातळीवर निवड झाली.
समूह गीत गायन स्पर्धा बालगट प्रथम क्रमांक कथा व गोष्ट सादरीकरण कु.संघमित्रा संदीप मेहरखांब प्रथम क्रमांक वकृत्व स्पर्धा किलबिल गट हर्ष संदीप मेहरखांब द्वितीय क्रमांक
वैयक्तिक गीत गायन स्पर्धा कु. संघमित्रा संदीप मेहरखांब (द्वितीय क्रमांक) निवड झाली असून बीट पातळीवर प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांची तालुका पातळीवर निवड झाली आहे.त्यांचे बीटातील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती.ठोकळ केंद्रप्रमुख श्रीमती.आशा घुले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य वरवंडी तसेच बीटातील सर्व शिक्षकांनी तसेच वरवंडी गावातील पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
