दाढ खुर्द हरणदरा शिवारात बिबट्या जेरबंद; आश्वी बुद्रुक मध्ये दर्शन

Cityline Media
0
सलग घटनांमुळे संगमनेर तालुक्यात भीतीचे वातावरण, पिंजरे वाढवण्याची मागणी

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,दाढ खुर्द–हरणदरा व आश्वी बुद्रुक या दोन्ही भागांत सलग घटना घडल्या आहेत.
दाढ खुर्द–हरणदरा परिसरात नुकतेच पहाटेच्या दरम्यान दाढ खुर्द शिवारातील गट नं. १३५ येथे सर्जेराव तुकाराम जोशी यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,तरी परिसरातील भीती कायम आहे. घटनेची माहिती 

मिळताच सरपंच सतीश जोशी यांच्यासह बी.टी. जोशी,सर्जेराव जोशी, ज्ञानेश्वर जोशी, नवनाथ जोशी, ईश्वर जोशी, राहुल जोशी, मनोहर जोशी, निलेश जोशी,सूर्यभान जोशी, संजय भांड,राजू पर्वत, गोवर्धन जोशी, संदीप जोरी, ज्ञानेश्वर वाडगे, विकास जोशी, अविनाश जोशी, गोरख भांड, नारायण काहार, संजय जोशी, अशोक जोशी, शांताराम महाराज जोरी आदी ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.

या परिसरात यापूर्वीही बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने मानवी व पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अजून पिंजरे तातडीने लावावेत अशी ठाम मागणी शेतकरी व नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. दरम्यान, वनविभागाने पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करून परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान,आश्वी बुद्रुक येथेही बिबट्याचे भरदिवसा दर्शन झाल्याने दहशत पसरली आहे. शनिवार (दि. २०) सायंकाळी ५ वाजता, आश्वी बुद्रुक–दाढ बुद्रुक रस्त्यालगत असलेल्या ताजणे मळा परिसरात प्रगतिशील शेतकरी भगवान इलग यांच्या वस्ती व शेतीलगतच्या बंदिस्त कुंपणावर मोठा बिबट्या बिनधास्तपणे फिरताना दिसून आला.

या भागात मोठी लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर भगवान इलग, शिवाजी इलग, सुनील घोडेकर, रवींद्र बालोटे, संपत ताजणे यांच्यासह स्थानिक शेतकरी व नागरिकांनी वनविभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी केली आहे.
सलग घडणाऱ्या घटनांमुळे संगमनेर तालुक्यात वनविभागाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!