आश्वी संजय गायकवाड महाराष्ट्राच्या गुप्तदान परंपरेतील सुवर्णपान समाजात माणुस्की, निःस्वार्थ सेवा आणि 'गुप्तदाना'ची परंपरा अजूनही केवळ जिवंत नाही, तर ती एका नव्या उंचीवर पोहोचली आहे, याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे पाहायला मिळाले आहे.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात ही घटना पहिली आणि अविस्मरणीय ठरली आहे.सुमारे ६०० विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांसाठी ९ लाख रुपये भव्य वाटप करून,कोणतीही ओळख न ठेवता,एका अज्ञात कुटुंबाने दातृत्वाचा एक नवा आणि तेजस्वी अध्याय लिहिला आहे.
घडले असे की फोन आला.. आणि अवघ्या अर्ध्या तासात चक्रे फिरले,विद्यालयाचे प्राचार्य सायराम शेळके यांना शाळा सुरू झाल्यानंतर अचानक एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला.त्या फोनवर दातृत्वाची इच्छा व्यक्त करण्यात आली.यानंतर अवघ्या ३० मिनिटांत एक वाहन विद्यालयाच्या आवारात दाखल झाले.
आलेल्या व्यक्तींनी नम्रपणे केलेली पहिली विनंती केली की "कृपया, सर्व शिक्षकांनी आपले मोबाईल बंद करावेत."या एका विनंतीतूनच या दातृत्वा मागील हेतू स्पष्ट झाला:प्रसिद्धी नव्हे,तर केवळ सेवा!'देणाऱ्याचे हात हजारो' नऊ लाखांचे रुपये निःशब्द वाटप
कोणताही गाजावाजा,औपचारिकता किंवा सत्कार समारंभ न करता,या अज्ञात दातृत्वशील कुटुंबीयांकडून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाटप सुरू झाले.
इयत्ता ८ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थिनी,सीनियर कॉलेज मधील सर्व विद्यार्थिनी,तसेच सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी.यांना सुमारे ६०० विद्यार्थिनी व महिलांना प्रत्येकी सरासरी १५०० रुपये किमतीचे मोफत ड्रेस/साडी.सन्मान:ड्रेस/साडी सोबत प्रत्येकाला लाडू व केळी देऊन सन्मानित करण्यात आले.
एकूण किंमत: या गुप्तदानाची अंदाजे किंमत ९ लाख रुपये इतकी आहे.ओळखीविना 'देवदूत' झाले अंतर्धान या संपूर्ण कार्यक्रमातील सर्वात विलक्षण आणि जगाला दिशा देणारी बाब म्हणजे या कुटुंबाने अत्यंत जाणीवपूर्वक आपली ओळख गुप्त ठेवली.आणि फोटोला सक्त मनाई केली कार्यक्रमाचा एकही फोटो काढू दिला नाही.पाहुणचाराचा विनम्र नकार दिला कोणताही सत्कार,पाहुणचार किंवा चहा-पाणी स्वीकारले नाही.ओळख गुप्त:आपली ओळख कोणालाही कळू नये यासाठी विशेष काळजी घेतली.
वाटप पूर्ण होताच,कोणतीही अपेक्षा न ठेवता,कोणताही निरोप न घेता, ते कुटुंब शांतपणे, अगदी गुपचूप निघून गेले. समाजातील मुलींच्या सन्मानासाठी आणि शिक्षण प्रेरणेसाठी केलेले हे खरे आणि शुद्ध गुप्तदान होते!विद्यालयाचा गौरव वाढला, कृतज्ञता दाटली!आजच्या 'प्रसिद्धी-उन्मुख' युगात,अशी निःस्वार्थ सेवा क्वचितच पाहायला मिळते.
या घटनेमुळे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव वाढला असून, केवळ विद्यार्थिनींमध्येच नव्हे,तर पालक,शिक्षक व संपूर्ण ग्रामस्थांमध्ये या अज्ञात 'देवदूतांबद्दल' कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे.
अशा अज्ञात दातृत्वशील कुटुंबाचे नाव जगाला माहीत नसले तरी,त्यांनी दिलेला 'निःस्वार्थ माणुसकी'चा संदेश मात्र कायम स्मरणात राहील आणि तोच या विद्यालयासाठी सर्वात मोठा सन्मान असेल.ही केवळ वार्ता नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील एका उज्ज्वल आणि प्रेरणादायी परंपरेचे दस्तऐवजीकरण आहे हे निस्वार्थ कृतीने सिद्ध झाले.
