श्रीरामपूर दिपक कदम शहरातील भि.रा.खटोड कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ६५ व्या वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थिती दर्शवुन विद्यार्थीनींशी संवाद साधला.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेला सन्मान स्वीकारून विविध स्पर्धांमध्ये, परिक्षेमध्ये नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थीनींचा सत्कार केला. आज संपूर्ण देशामध्ये विद्यार्थीनी खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घालत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या विद्यालयातून सुद्धा अशाच रणरागिणी भविष्यात तयार होऊन आपल्या विद्यालयाचे व श्रीरामपूरचे नाव सातासमुद्रापार घेऊन जातील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी. संजय जोशी.दत्तात्रय साबळे,.अभय बाफना,
सौ. रीमा गोसावी,.चंद्रकांत सगम,.अरूण धर्माधिकारी, पत्रकार.अशोक गाडेकर, मा. प्रा.सौ.चित्रा कडू, प्राचार्य सौ. मंगला भोसले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
