लोणी प्रवरा-ज्ञानेश्वर साबळे समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे,एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांचा आज वाढदिवस.
त्यानिमित्ताने त्यांना संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून आणि विशेषतः लोणी प्रवरा परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ज्ञानेश्वर अहिरे यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीतून आणि सामाजिक जाणिवेने अल्पावधीतच एक मोठे संघटन उभे केले आहे.त्यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक कार्याचा आलेख असाच उंचावत राहो आणि त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो,अशी भावना त्यांचे मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वर अहिरे "तुमचा सामाजिक कार्याचा आलेख असाच उंचावत राहो अशा सदिच्छा शुभेच्छुक स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संघटना:- कार्य अध्यक्ष संपत (आबा) निर्मळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे तालुका कार्यकारणी सदस्य श्रीपाद बोकंद व समस्त ग्रामस्थ, लोणी प्रवरा परिसर यांनी दिल्या.
