शेवगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Cityline Media
0
शेवगाव दंगल प्रकरणी वंचितचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्यावर होता खोटा गुन्हा दाखल 

शेवगाव प्रतिनिधी शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत १४ मे २०२३ ला हिंदू मुस्लिम दंगल घडली होती,त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा किसन चव्हाण हे त्यांच्या नियोजित दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. सकाळी ७.३० च्या दरम्यान ते शेवगाव वरून निघाले व रात्री संभाजीनगर येथून ते १०.३० दरम्यान शेवगावला त्यांच्या निवासस्थानी परत पोहचले होते. दरम्यानच्या काळात शेवगावची दंगल घडून गेलेली होती.तरी ही त्याकाळचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,अजित पाटील. पोलिस निरीक्षक विलास पुजारी व संतोष मुटकूळे यांनी संगनमत करून प्रा. किसन चव्हाण यांच्यावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केला होता.
 प्रा. किसन चव्हाण यांनी त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे त्याच्या वकीलातर्फे अटकपूर्व जामीन दाखल करून खरी परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणली असता न्यायालयाने प्रा.किसन चव्हाण यांना जामीन मंजूर केला होता.त्यानंतर त्यांना खोट्या गुन्हात अडकवले असल्याने

 प्रा किसन चव्हाण यांनी तात्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील.पोलिस निरीक्षक विलास पुजारी व संतोष मुटकूळे यांच्या विरोधात सीआरपीसी १५६/३ नुसार जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे भादवी कलमानूसार व अनुसूचित जाती आणि (अनुसूचित जमाती शेड्युल्ड कास्ट ॲन्ड शेड्युल्ड ट्राईब) अत्याचार प्रतिबंध कायद्यानूसार अर्ज दाखल केला होता. 

त्यावर  जिल्हा व सत्र न्यायाधीश लोणे यांनी आदेश पारीत करून शेवगाव पोलीसांनी यावर त्याचे म्हणणे दाखल करावे असा आदेश पारीत केला होता. त्यानूसार दोन वर्ष ओलांडूनही शेवगाव पोलिसांनी आजतागायत त्याचे म्हणणे मांडले नव्हते. विशेषता: ज्यांची चौकशी करायची होती.

ते पोलिस निरीक्षक पाथर्डी येथे काही महिन्या पूर्वी हजर झाले आहेत,चौकशीत चालढकल करीत जाणीवपूर्वक चौकशी अधिकारी दिरंगाई करत असल्याने प्रा.किसन चव्हाण यांनी  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल केली होती व त्यावर  उच्च न्यायालयाने आदेश पारीत करून शेवगाव पोलिसांनी त्वरीत अहवाल सादर करावा असा आदेश पारीत केलेला आहे. 

परंतू शेवगाव पोलीसांनी सदरची चौकशी जाणूनबूजून लांबवली होती. अंतिमतः आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  महेश लोणे   न्यायालयाने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची अहिल्यानगर  जिल्ह्या बाहेरील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोन महीन्यात पोलिस निरीक्षक पुजारी यांची चौकशी करून दोन महिन्याच्या आता अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आलेला आहे. प्रा. किसन चव्हाण यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ दिपक शामदिरे,ॲड कृणाल सरोदे अ़ॅड.शुभम जोशी व अ़ॅड किरण जाधव यांनी काम पाहीले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!