व्यसनाधीन पतीकडून २५ वर्षीय पत्नीचा खून

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पंचवटीतील इंद्रकुडा समोरील रामकुंडाकडे जाणाऱ्या उत्तमराव ढिकले मार्गावर काल सायंकाळच्या सुमारास नवऱ्याने पंचवीस वर्षीय पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून केल्याची घटना घडली.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
मृत महिला व तिची सासू या दोघी जणी गोदाघाटावरील धार्मिक विधींसाठी पुरोहितांना मदत करत असे,आणि त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर उदरनिर्वाह करतात. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या महिलेचा गळा आवळून नवऱ्याने खून का केला, कुठल्या कारणाने केला, याचा शोध पोलीस घेत आहे. शितल नितीन भामरे (वय २५) असे मयत पत्नीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील रामकुंडाकडे इंद्रकुंडासमोरील उतारावरील उत्तमराव ढिकले मार्गावर रस्त्यालगत मयत शीतल ही सासू, सासरे व नवऱ्यासे रहात होती. नवरा हा व्यसनाधिन होता. सासरा हा भीक मागत असे, तर शीतल ही नवरा व तिच्या सासूसह रामकुंडावर विधी कर्म करताना सहाय्य करण्याचे काम करीत असे. बऱ्याच दिवसांपासून मयत शीतल व पती नितीन भामरे यांच्यात वाद सुरू होते.

नुकतेच दुपारी घर बंद असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी मयत शीतल हिची गावाकडे गेलेल्या सासू आणि सासरे यांना फोन करून कळविले. सायंकाळच्या सुमारास सासू व सासरे हे घराजवळ आले. आणि त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात गेले असता त्यांना शीतल ही मृतावस्थेत आढळून आली. ही घटना एका सुजान नागरिकाने पंचवटी पोलीस ठाण्यास कळविली. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास कार्य सुरू केले. घटनास्थळी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

पत्नी शीतल व पती नितीन भामरे यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून काल सकाळपासूनच वाद सुरू होते. शीतलने याबाबत नणंद पूनम बबन देसले हिला फोनद्वारे वादाची कल्पना दिली होती. ती गावी आलेल्या आई वडिलांसह नाशिकला आली. तेव्हा घरात शीतलचा मृतदेह आढळून आला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नितीन याने पत्नीचा गळा दाबून दरवाजा लावून पलायन केले. त्यानंतर एक तासाने ही घटना उघडकीस आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!