राज्य महामार्गावर राहुरी शहरालगत आनंदवन परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राज्य महामार्गावरील आनंदनगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर मनमाड राज्य महामार्गावरील आनंद मोटर्सच्या पाठीमागे पत्रकार राजेंद्र वाडेकर यांच्या घराजवळ बुधवारी राञी ८ वाजण्याच्या दरम्यान या बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले.
अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या गॅरेजच्या जवळ असलेल्या पाण्याच्या हौदाकडे बिबटाने आपली स्वारी वळवताच या ठिकाणी काम करणारे पेंटर, फिटर तसेच वाहन मालकांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. आनंद मोटर्सच्या पाठीमागील झुडपातुन बिबट्या आल्याची खबर परिसरात पसरल्याने गुरूवारी सकाळी अनेकांनी घटनास्थळी येवुन माहिती घेतली.

नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या आनंद मोटर्स, सुनील वाईन्स या दुकानांच्या पाठीमागील जागेतील खाजगी मालकांच्या रिकाम्या प्लाॅट मध्ये मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळी तसेच गवताचे उदंड पीक असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षीत जागा उपलब्ध झाली आहे.

गेल्या आठवडे भरापासुन शाहूनगर भागात बिबट्याचे वास्तव असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असल्याची माहिती राजेंद्र वाडेकर, अनिरुद्ध कुलकर्णी व भाऊसाहेब शेटे यांनी दिली. या परिसरात बिबट्याचा संचार सुरू असल्याची खबर राहुरीचे वनपाल राजू रायकर यांना गुरूवारी सकाळी देण्यात आली. 

माञ बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पिंज-याची व्यवस्था अपुरी असल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत या भागात पिंजरा लावण्यात येईल, असे वन अधिका-याने सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!