मुंबई प्नतिनिधी जनहित शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित सौ. जया भालेराव खंबाळकर स्मृती स्त्रीरत्न सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे त्याग,धैर्य आणि संघर्षाला वंदन करणारा हा ऐतिहासिक सोहळा जया भालेराव खंबाळकर यांच्या स्मरणार्थ दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वा. शिवाजी मंदिर, दादर येथे एक अत्यंत ऐतिहासिक, वैचारिक आणि प्रेरणादायी सोहळा होत आहे.
राजस्थान मध्ये जाऊन मनुच्या पुतळ्याच्या तोडाला काळे फासुन स्त्रीस्वातंत्र्य,समता आणि मानवमूल्यांची मशाल पेटवणाऱ्या आणि त्या संघर्षासाठी शिक्षा भोगलेल्या कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार या धाडसी महिला आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लढाऊ महिला आशा लांडगे आपल्या सुमधुर व बंडखोर आवाजाने समाज प्रबोधन करणाऱ्या गायिका चंद्रकला गायकवाड, सुषमा देवी यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर "स्त्रीरत्न" पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून, तो आहे अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या धैर्यवान महिलांच्या संघर्षाला दिलेली मानवंदना.हा गौरव सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या वैचारिक पर्वात रिपब्लिकन पक्षाचे सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी आणि आबेडकरी सांस्कृतिक विश्वातील नामवंत कलावंत आनंद शिंदे,मिलिंद शिंदे,विष्णु शिंदे, गौतम हराळ, निशा भगत, वैशाली किरण,अंजली भारती, छाया मोरे, कविता शिंदे आणि अनेक मान्यवर आंबेडकरी कलाकार यांची उपस्थिती लाभणार आहे.
हा सोहळा म्हणजे स्त्रीशक्तीचा जयघोष, संघर्षाची प्रेरणा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जिवंत जागर आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमास सर्व आआंबेडकरी बाधव, भगिनी, कार्यकर्ते व कलावंतानी आवर्जून उपस्थित राहावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी केले.
