पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क एका सतरा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची निघृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पुणे येथे उघड झाला आहे.इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या माध्यमातून आरोपींनी मृत मुलाला कात्रज परिसरात बोलावून घेतले.त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेऊन त्याचा दगड व कोयत्याने वार करून खून केला.याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, या घटनेप्रकरणी दोन विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. धबाले (वय १९, रा. शिवणे, पुणे) या दोघांना अटक केली आहे, तर अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,अमनसिंग हा मुलगा गाडी घेऊन घरातून गेला; पण तो परत न आल्याने त्याच्या आईने दि. ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर मुलाच्या मोबाइलचा सीडीआर व लोकेशन वरून विश्रांतवाडी पोलीस ठाणे,तसेच गुन्हे शाखा, युनिट ३ पुणे शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू केला. मृत अमनसिंग गच्चड याला प्रथमेश चिंधू आढळ, नागेश बालाजी धबाले, दोन विधीसंघर्षित बालक व इतर मित्रांनी उत्तमनगर परिसरात नेले.
जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.आरोपी हे बेळगाव येथील असल्याचे समजल्यावर त्यांनी कर्नाटकात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले.त्यानंतर दगड आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
