संगमनेर प्नतिनिधी तालुक्यात जोर्वे येथील जिल्हा परिषद शाळेत २०२५,२६ या शैक्षणिक वर्षात वेगवेगळ्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.
त्यात इयत्ता चौथीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी दीपक भोत हिने वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच " सही पोषण देश रोशन" या नाटिकेची तालुकास्तरावर निवड झाली तसेच जगी घुमवा रे दुमदुमवा रे" या समूहगीताचा बीट पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला.
स्वरा अमोल दिघे या विद्यार्थिनीने माझे बाबा या विषयावर वकृत्व स्पर्धेत बीट पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला तसेच केंद्र पातळीवर कल्याणी शिरीष कुमार इंगळे वेशभूषा सादरीकरण केंद्र पातळी द्वितीय क्रमांक तसेच स्वराली किरण काकड वेशभूषा स्पर्धा केंद्र स्तर तृतीय क्रमांक वकृत्व स्पर्धा पल्लवी अण्णासाहेब काकड केंद्र पातळीवर द्वितीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत जोर्वे मुख्याध्यापक सौ.लता कढणे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन कमिटी जोर्वे तसेच गटशिक्षण अधिकारी पंचायत श्री.गुंड विस्तार अधिकारी श्री.राऊत केंद्रप्रमुख सुभाष राहाणे श्रीमती लता भागाजी कढणे.मुख्याध्यापक श्रीमती लता भागाजी डेंगळे. श्रीमती सरिता बाळकृष्ण फणसे.श्रीमती सीमा रामभाऊ भालेराव.श्रीमती सुनंदा यमनाथ राहाणे.श्रीमती कांचन कारभारी पवार.सर्व ग्रामस्थ सर्व पालक सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोर्वे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
