राज्यातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन अश्व प्रेमींसाठी पर्वणी ठरणार
संगमनेर नितीनचंद्र भालेराव प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट,येथे माघ पौर्णिमे निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत यात्रा उत्सवानिमित्त कला, क्रीडा,कृषी
,सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यभरात प्रसिद्ध असलेला भव्य अश्व स्पर्धा व पशुपक्षी प्रदर्शन,अश्व बाजार असा मोठा मेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. देशभरातून अनेक अश्वमालक उच्च प्रजातीचे अश्व या ठिकाणी येत असतात.या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक निर्माण झाला आहे.
खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा माघ पौर्णिमे यात्रा उत्सव रविवार दि.१ फेब्रुवारी ते सोमवार दि.२ फेब्रुवारी दोन दिवस साजरा होणारा आहे.
शनिवारी रात्री देवाची काठी भव्य दिव्य पालखी छबिना मिरवणुकीने यात्रा उत्सवात सुरुवात होईल.
रविवारी सकाळी ७ ते ७.३० वा. ग्रामदैवत हनुमान मंदीरात ग्रामदैवत पुजन, सकाळी ८ ते ९ वा. सवाद्य काठी पालखी मिरवणूक खंडोबा मंदिरापर्यंत सकाळी 9 ते १० वा.मान्यवरांच्या हस्ते श्री.ची महापुजा,मंगलस्नान,
महाआरती होईल.त्यानंतर देवगड अश्व घोडे खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा देवगड अश्व स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
रविवारी रात्री ९ ते १२ वा. राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा मोफत कार्यक्रम होईल.रविवारी रात्री ९ ते १२ वा. सोमवारी सकाळी ८ ते १२ वाघ्या मुरळी यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम होईल.
तसेच सकाळी ९ ते ११ वा. मालती इनामदार लोकनाट्य तमाशाचा हजेरी चा कार्यक्रम,सोमवारी दुपारी ३ ते ५ वा. श्री क्षेत्र देवगड केशरी हा भव्य कुस्त्यांचा हगामा होणार आहे.
या वर्षी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले आहेआद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरी यात्रा उत्सवा निमित्त
राज्यभरातून येणाऱ्या कलावंताच्या स्वागताला सज्ज झाली आहे.
संगमनेर तालुक्यासह राज्यातून येणाऱ्या खंडोबा भक्तांसाठी ही यात्रा खास पर्वणी ठरणार आहे.यात्रा उत्सवासाठी आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे या कामे सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे.तरी या माघ पौर्णिमा यात्रा उत्सवाला उपस्थीत राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रेची शोभा वाढवावी आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,उपाध्यक्ष संतोष पावसे,सचिव अनिल गडाख, खजिनदार गणेश शिंदे व सर्व विश्वस्त मंडळ व देवगड अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष उत्तम जाधव,यात्रा उत्सव समिती अध्यक्ष मच्छिंद्र गडाख, हिवरगाव पावसा ग्रामपंचायत, सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे.
