दिवंगत बबनराव पावसे स्मरणार्थ जि.प.शाळेच्या स्वागत कमानीचे लोकार्पण
संगमनेर नितीनचंद्र भालेराव संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भाजप कार्यालय येथे ध्वजारोहण व
प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत ने जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलेल्या संवादात्मक फळाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच सुभाष गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक आर.पी.रहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तसेच जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार कमान राजहंस दूध संघाचे
संचालक डॉक्टर प्रमोद पावसे यांचे वडील स्वर्गीय बबनराव गोविंदराव पावसे यांच्या स्मारणार्थ जिल्हा परिषद शाळेला स्वागत कमान डॉ.प्रमोद पावसे,दिपक पावसे, प्रमिला राहणे,कमल खुळे यांनी भेट दिली.सदर प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन सुनंदा बबनराव पावसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित झाले.
ग्रामपंचायत कडून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून संवादात्मक फळा जिल्हा परिषद शाळेला देण्यात आला त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.केंद्रीय पोलीस दलात निवड झालेले हिवरगावचे सुपुत्र धीरज पावसे व सुरज पावसे यांच्या हस्ते भाजप कार्यालय येथे ध्वजारोहण झाले त्यानंतर देवगड विद्यालयातील विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांची संपूर्ण गावातून लेझीम नृत्य सादर करत प्रभात फेरी झाली.
विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला अनेक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कौतुक केले.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,ग्रामविकास अधिकारी हरिष गडाख,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,पोलीस पाटील मथाजी पावसे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे,
मुख्याध्यापिका सुनंदा उगले,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,भाजपा तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे,देवगड
खांडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब पावसे,
जय मल्हार दूध उत्पादक संस्थाचे अध्यक्ष डॉ.संदीप पावसे,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, देवगड अश्वप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव,वृक्ष मित्र गणपत पावसे यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व संस्थांचेपदाधिकारी,शिक्षक,कर्मचारी वृंद विद्यार्थी,पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
