खांबेत पार पडलेल्या केंद्रस्तरीय शाळेत वरवंडीच्या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Cityline Media
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी खोखो स्पर्धेत विद्यार्थिनींचा संघ केंद्रात प्रथम

वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील खांबे येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील खोखो या खेळामध्ये मुलींच्या संघाचा केंद्रात प्रथम क्रमांक आलातसेच वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे या स्पर्धेमध्ये आराध्या लक्ष्मण गागरे ही विद्यार्थिनी केंद्रात प्रथम आली तसेच उंच उडी या स्पर्धेमध्ये विवेक संपत भोसले
ह्या विद्यार्थ्यांचा प्रथम आला व लांब उडी मध्ये देखील मुलांमध्ये विवेक भोसले तिसरा आला 
तसेच धावणे या स्पर्धेमध्ये मुलांमधून कार्तिक जालिंदर दशवंत याचा तिसरा क्रमांक आला जिल्हा परिषद वरवंडी शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ वरवंडी यांचे तर्फे विजयी स्पर्धकांचे अभिनंदन व हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!