नाशिक दिनकर गायकवाड घराच्या कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सातपूर येथे नुकतीच घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी कांता प्रवीण वरंदळ (रा. महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, सातपूर) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दोन हजार रुपये
किमतीचे दोन ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, ७५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत, २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, १३ हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी दि. ३० ऑगस्ट २०२५
ते ६ जानेवारी २०२६ च्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.
