पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पुष्प पहिले
झरेकाठी सोमनाथ डोळे बौध्दीक साधनांच्या जोरावर नाही तर निसर्गा सोबत राहून जीवन सुंदर होणार आहे. संताच्या अंगी असलेले मोठेपण शोधा. आनंदाच्या जागा शोधून इतरांच्या आनंदात आनंद शोधा.संकटाचा सामना करू शकलो तरच जीवन सुंदर असल्याची जाणीव होईल असा संदेश व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिला.
लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात २५ व्या पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहीले पुष्प गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर वेगवेगळे संदर्भ देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील होत्या.
विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, मा. अध्यक्ष कैलास तांबे,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डॉ. आर.ए. पवार आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
श्रोत्यांचे प्रबोधन करतांना गणेश शिंदे पुढे म्हणाले की जीवन जगतांना स्वता:यंत्र न होता माणूस म्हणून सर्वाना बरोबर घेवून जगले पाहीजे.आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहीजे.छोट्या गोष्टीत आनंद असतो तो शोधला पाहीजे.
आपल्या अंगी असलेले कौशल्य, नातीगोती, नात्यांतील प्रेम आणि आपली माणसे जपा प्रेम करा प्रेम द्या. परिवर्तनाचा ध्यास घेत रहा. बदलत्या शैलीचा अंगीकार करतांना कुणाचे अनुकरण करण्यापेक्षा समाधानी रहायला शिका. जीवन हेच आनंदासाठी महत्वपूर्ण आहे. पैशाने जीवन सुंदर होणार नाही आणि पैशाचा आनंद टिकणारही नाही.
आपल्या अंतरमनाचा अंदाज घेवूनच वाटचाल झाली पाहीजे असे सूचित करून साधुसंताचे विचार समजून घेतानाच वेळप्रसंगी संकटाना समोरे जातांना आनंदीवृृृत्तीने जा.आपल्या जगण्याचे आपणच कौतुक करा कोणतीही कला जपा कलेतूनच आपण मोठे होऊ शकतो आणि आपले जीवन आनंदी होऊ शकते.
आपल्या आनंदाची संकल्पना बदला प्रत्येक गोष्टीत आनंद माना असे सांगत प्रवरेच्या या भूमीमध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून सर्व सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत या माध्यमातून आपण प्रगती करा आणि हा प्रगतीच्या माध्यमातून आपणही पुढे जा आणि इतरांनाही पुढे घेऊन जा.
हा संदेश लोणीच्या सहकार पंढरीच्या माध्यमातून आपण रुजावा असे असेही सांगत असे सांगत आपल्या व्याख्यानाचा समारोप त्यांनी काय सांगू राणी तुला मला गाव सुटाना या गीताने केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये ही व्याख्यानाला होत आहेत व्याख्यानाच्या माध्यमातून विचाराचा जागर व्हावा व्याख्यानेच्या माध्यमातून सकारात्मक विचार निर्माण व्हावेत हाच दृष्टिकोन राहिला आहे.
प्राचार्य डॉ.आर. ए.पवार यांनी प्रास्ताविकांतून व्याख्यानमालेचा उद्देश सांगत आज २५ वर्षांमध्ये संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचा आढावा घेत असतानाच व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचाराचे आदान प्रदान व्हावे आणि या माध्यमातून आदर्श समाज निर्माण व्हावा हाच उद्देश या व्याख्यानमालेचा राहिला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.शांताराम चौधरी यांनी केले. आभार प्राचार्य डाॅ.रविंद्र जाधव यांनी मानले. पुढच्या
पद्मश्रीनी सहकार चळवळीतुन सर्वथैव सुविधा निर्माण केल्या.
