कर्जतच्या खर्डा ‌पोलीस ठाणे हद्दीत ९८५४ किलो गांजासह ३,४६,४७५ मुद्देमाल जप्त

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई,

अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा घटकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती घेत कारवाई करण्याचे आदेश नुकतेच दिलेले आहे.
आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी पोलिस निरीक्षक  किरण कबाडी,स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे असमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग पोलीस अंमलदार,

ह्रदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर, चालक महादेव भांड  यांना रवाना केले.
हे पथक  खर्डा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त खबऱ्या मार्फत एक इसम त्याचेकडील हिरो कंपनीची सी. डी. डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम.एच.१६ बी. २५५० हि वरुन अंमली पदार्थ गांजा घेवुन विक्री करीता तरडगांव फाटा येथुन तरडगांव गावचे दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. 

या माहिती नुसार  पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांना कळविले असता त्यांनी खर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने तात्काळ खर्डा पोलीस ठाणे येथे जावुन सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांना

मिळालेल्या माहितीचा लेखी अहवाल दिला असता त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत व पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळु खाडे, धनराज बिराजदार, शकिल बेग नेम. खर्डा पोलीस ठाणे यांच्यासह कारवाई करण्याकरीता 
आवश्यक 

त्या साहित्यासह पोलीस ठाणे मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन तरडगाव फाटा ता. जामखेड येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना माहितीतील नमुद मोटार सायकल तरडगांव ते तरडगांव फाट्याचे दिशेने येतांना दिसली तेव्हा खबरीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने 

पथकाने मोटार सायकल थांबवुन त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपुत यांनी पोलीस कर्मचारी, पंचाची ओळख समजावुन सांगुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे १) सचिन नवनाथ गायकवाड वय- २५ वर्षे रा. पिंपरखेड, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर, २) सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे, वय-२३ वर्षे रा. खर्डा, ता.जाखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

 तेव्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपुत यांनी मिळालेल्या माहितीनुसार हकिगत सांगुन त्यांचे व मोटार सायकल झडतीचा उद्देश समजावुन सांगुन झडती घेतली मोटार सायकलवील गोणीमध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया असे संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला. त्याबाबत सदर ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता इसम नामे ) सुभम घुंगरे रा.माहीजळगांव ता. कर्जत जि. अहिल्यानगर (फरार) यांचेकडुन विक्रीकरीता आणलेला असल्याचे सांगितले. 


आरोपीच्या ताब्यातुन २,४५,४७५रु कि.चा ९.८५४ कि.ग्रॅम अंमली पदार्थ गांजा, ३०,००० किमंतीचे दोन मोबाईल, १०००-रु किमंतीचे रक्कम, ७०,०००रु कि.चा एक मोटार सायकल असा एकुण ३,४६,४७५रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

 ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/१५६६ श्यामसुंदर अंकुश जाधव यांनी  दिलेल्या फिर्यादीवरुन खर्डा पोलीस ठाणे गु. र. नं. २२/२०२६ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) आय (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुढील तपास खर्डा पोलीस ठाणे करीत आहे. 
 जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रविणचंद लोखंडे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व खर्डा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!