राष्ट्रसेविका समिती संगमनेर मुक्ताई शाखेचा प्रथम वर्षपुर्ती व महासंक्रांती उत्सव साजरा

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे राष्ट्रसेविका समिती, संगमनेर मुक्ताई शाखेचा प्रथम वर्षपूर्ती समारंभ व मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ उत्सव नुकताच गंगामाई घाट परिसरात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ.रचना मालपाणी व सौ.नीलिमा खताळ उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर तालुका कार्यवाहिका सौ.वैशाली देशपांडे यांनी केले. त्यांनी मुक्ताई शाखेच्या स्थापनेपासून गेल्या एका वर्षात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक,सांस्कृतिक व शारीरिक उपक्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमात वेदांगी कोथमिरे यांनी शाखेचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.शाखेतील विद्यार्थिनी व स्वयंसेविकांनी दंड प्रहार, योगचाप (लेझीम) तसेच ‘नियुद्ध’ म्हणजे कोणत्याही शस्त्राविना स्वसंरक्षण कसे करावे याची शिस्तबद्ध व प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रसंगी शाखेत नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या विविध खेळांचेही छोटेखानी सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमात अनुजा दिवेकर हिने वैयक्तिक गीत सादर केले, तर अनुष्का कर्पे हिने सांघिक गीत व शाखेची प्रार्थना सादर केली. वक्त्यांचा परिचय ज्ञानश्री महाले हिने करून दिला.

यावेळी सौ.प्रज्ञा म्हाळस यांनी मकरसंक्रांती उत्सवाचे महत्त्व सांगून राष्ट्रसेविका समितीच्या कार्याची माहिती दिली. आजच्या काळात मुलींमध्ये संस्कार, स्वसंरक्षणाचे धडे व सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी राष्ट्रसेविका समितीचे कार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उद्बोधन करताना प्रमुख अतिथी सौ. रचना मालपाणी यांनी मुक्ताई शाखेच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. अधिकाधिक माता-भगिनींनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.वैशाली देशपांडे, प्रज्ञा म्हाळस,वेदांगी कोथमिरे, निकिता परदेशी, अनुजा दिवेकर,कीर्ती नावंदर, स्वप्नाली तापडे, स्नेहल म्हाळस व लीना टाक यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास संगमनेरकर महिला व मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच संगमनेर तालुका संघचालक सुभाष कोथमीरे, राजेंद्र देशपांडे, मुकुंद डांगे, हरिदास कमठम, ज्ञानेश्वर थोरात, सौरभ म्हाळस, प्रवीण कर्पे, विवेक कोथमीरे आदी स्वयंसेवकांचीही उपस्थिती होती.

समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी भविष्यात हे कार्य अधिक व्यापक व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील अधिकाधिक बालिका, युवती व महिलांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!