अध्यक्षपदी पुजा मुन्तोडे सरचिटणीस वर्षा मुन्तोडे कोषाध्यक्ष साधना मुन्तोडे
आश्वी संजय गायकवाड प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला विभागांतर्गत महिला ग्राम शाखेची औपचारिक स्थापना जाहीर करण्यात आली. या नवीन शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी, धम्म प्रसारासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
शाखेच्या अध्यक्षपदी पुजा मुन्तोडे, सरचिटणीस पदावर वर्षा मुन्तोडे तर कोषाध्यक्षपदी साधना मुन्तोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाखेचा लोकार्पण कार्यक्रम दि. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी आयोजित सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी शकुंतला जाधव होत्या.सूत्रसंचालन आशा खरात यांनी तर आभार प्रदर्शन पुजा मुन्तोडे यांनी केले.सभा दरम्यान उपाध्यक्ष, सचिव आणि संघटक अशा पदांसह संपूर्ण कार्यकारिणीची रचना करण्यात आली.
कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
