२१ फेब्रुवारी २०२६ ला गंजमाळ येथे कविवर्य नारायण सुर्वे सामाजिक वाचनालयाच्या पुरस्काराचे वितरण
नाशिक दिनकर गायकवाड नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे सामाजिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार' दिला जातो सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या प्रतिष्ठानचा पुरस्कार यापूर्वी कॉ. गोविंद पानसरे,डॉ गेल ऑम्वेट, डॉ रूपा बोधी-कुलकर्णी,उषा वाघ,शांता रानडे,मेहरूनिसा दलवाई, डॉ यशवंत सुमंत, दत्तात्रय सकट, डॉ नसलीम पटेल, सुकन्या मारुती, मा. आमदार जीवा पांडू गावित, समाजवादी नेते सुभाष वारे, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, ज्येष्ठ पत्रकार मा. निरंजन टकले,शाहीर संभाजी भगत आदींना प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षाच्या 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सविधान रक्षक पुरस्कारासाठी' सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा चालवण्या-या व संविधान मूल्य जोपासण्यासाठी योगदान देणाऱ्या संविधान रक्षक कांताबाई अहिरे, शिलाबाई पवार (संभाजीनगर) आणि नाशिक येथील माधवी जाधव यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी अकरा हजार,स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे आहेत. पुरस्कार वितरण जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे असतील.यंदा या पुरस्काराचे २१ वे वर्षे आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता रोटरी क्लब, गंजमाळ नाशिक येथे होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत राजू देसले विश्वस्त कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक यांनी दिली.
या पुरस्कार समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष: उत्तम कांबळे, उपाध्यक्ष:- डॉ. हेमलता पाटील, सचिव:- वादीराज नाईक, सहसचिव:- डॉक्टर मनीषा जगताप,खजिनदार:- दत्तू गणपत तुपे, विश्वस्त राजू देसले,रविकांत शार्दुल,श्रीकांत पाटील, डॉ विशाल जाधव, स्वानंद जोशी,पंडित बागुल यांनी केले आहे.
