एस पीज योग स्टुडिओ तर्फे सूर्यथॉन २०२६ अखंड सुर्यनमस्कार योगासने कार्यक्रमाचे आयोजन

Cityline Media
0
७,८ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात आयोजन 

पुणे प्रशांत निकम शहरातील एस पीज योग स्टुडिओ तर्फे सूर्योथॉन २०२६ या सलग २४ तास अखंड सूर्य नमस्कार योगासने कार्यक्रमाच्या उउदघाटनाचे आयोजन ७ फेब्रुवारी २०२६ रोजी  सायं ६.३० वाजता पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नरहरी कुदळे गार्डन येथे करण्यात आले होते.
सूर्योथॉन या  कार्यक्रमाचे ७ फेब्रुवारी  सायं ६.३० ते ८ फेब्रुवारी २०२६ सायं ६.२० दरम्यान पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नरहरी कुदळे गार्डन येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून वैभव शास्त्री उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळो प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  एस पीज योग स्टुडिओचे संस्थापक अध्यक्ष सचिन पारुंडेकर, उमेश आहेरवाडीकर उपस्थित होते. सूर्यनमस्कार व योग यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सूर्योथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. एस पीज योग स्टुडिओचे संस्थापक  अध्यक्ष सचिन पारुंडेकर यांनी आतापर्यंत साडे चौदा लाख सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम केला आहे.

या अखंड २४ तास सूर्यनमस्कार योगासनांमध्ये उपस्थित नागरिकांनी  योगशिक्षक सचिन पारुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सूर्यनमस्कार योगासनांची प्रात्यक्षिके केली. सूर्योथॉनमध्ये लहान गट व प्रौढ गटांमध्ये जे जास्त सूर्यनमस्कार करतील त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. या सूर्योथॉनमध्ये ३०० ते ३५० नागरिक सहभागी होणार आहेत.

सूर्यनमस्कार योगासने केल्यामुळे हृदयाची गती वाढते, हृदयाचा व्यायाम होतो  व शरीराची लवचिकता वाढते.या सुर्योथान  २०२६ चा समारोप  ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दीपक नागपुरे, निलेश भिसे,तुषार कुलकर्णी, क्रीडा महर्षी डॉ. अरुण दातार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एस पीज योग स्टुडिओचे संस्थापक अध्यक्ष सचिन पारुंडेकर,उमेश आहेरवाडीकर,महेश गणेशवाडे,दिलीप चव्हाण यांनी परिश्रम घेतले आहेत. तरी  या "सूर्योथॉन २०२६ योगासनांच्या  कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सूर्यनमस्कार करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!