इगतपुरी बोधिवती देहाडे बौद्ध असल्याचे भासवून मुस्लिम युवकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना इगतपुरीत नुकतीच घडली.
इगतपुरीतील एका युवतीची सध्या सुरू असलेल्या प्रेम प्रकरणामध्ये अनेक धागे उलगडत आहे.काही दिवसापासून मैत्रीचे संबंध असताना साखरेसारखं गोड पण खोट बोलून मी बौद्ध समाजात जन्माला आलो असे सांगून तिची फसवणूक करण्यात आली.
फिर्यादी नुसार २३ मार्च २०२२ अल्पवयीन असताना तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले.वारंवार होत असलेल्या त्रासामुळे मुलीने वेगळ होण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोन वेळेस जबरदस्तीने येथील कपालेश्वर मंदिराजवळ बोलवून तुझ्यासहित तुझ्या घरच्यांना माझ्या मामांं ला सांगून मारून टाकेन अशी जीवे मारण्याची धमकी युवकाने दिली.
मुस्लीम धर्म स्विकारुन धर्मांतर करण्यासाठी वेळोवेळी त्याने धमकावले त्यातच घरात घुसून दोनदा तिच्यावर बलात्कार केला.या कारणांवरतून त्या १९ वर्षीय युवतीने इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी फिर्याद दाखल कर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (डी), ३२९ (२), ३५१ (२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४ व ६ प्रमाणे संशयित आरोपी मुस्तफा शेख रा.नाशिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्यानुसार कठोर चौकशी व तपास सुरू आहे..या प्रकरणामुळे इगतपुरी मध्ये इगतपुरीत लव जिहाद प्रकार घडलाय का?? असा सर्वत्र सवाल आणि आरोप नागरिकांकडून होतोय.
