श्रीरामपूर दिपक कदम शहरातील मेनरोड वरील श्रीराम मंदिर,श्री काळाराम मंदिर, हनुमान मंदिरासह विविध मंदिरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.दरम्यान, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रथ मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
श्रीराम मंदिरावरील झेंड्यांची मिरवणूकीत महसूलसह श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते.उत्सवाच्या मिरवणुकीचे हे वैशिष्ट्य ठरले.मिरवणूक काढण्यात आली.पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी सायंकाळी श्रीराम रथाची भाविकांची गर्दी दाटली होती.
श्रीराम मंदिरासह परिसरात आकर्षक सजावट करून, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.उत्सवानिमित्त श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती फुलांनी सजविण्यात आल्या. यावेळी पंजिरीचा प्रसाद वाटण्यात आला.श्रीराम मंदिरातील सप्ताहाची
सांगता कीर्तनाने करून,श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार हेमंत ओगले,ससाणे,नगराध्यक्ष करण प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मनीषा सावंत, मिलिंदकुमार तहसीलदार वाघ, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, रोहिणी घोलप,मा. आमदार भाऊसाहेब कांबळे मा.आमदार लहुजी कानडे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,भाजपा नेते संजय फंड,नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,मंजुश्री मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, आशिष धनवटे,संजय छल्लारे, सिध्दार्थ फंड,कुणाल करंडे, सचिन गुजर,बाबासाहेब दिघे, दीपाली ससाणे,गौतम उपाध्ये, सत्यनारायण उपाध्ये,अशोक उपाध्ये, दिलीप नागरे, संजय गांगड दीपक कदम विशाल अंभोरे प्रतीक बोरवके आशिष बोरावके बाजार समितीचे सभापती सुधीर नवले,डॉ.वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, भाजपाचे तिलक डुगरवाल, सुभाष त्रिभुवन, चरण त्रिभुवन श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, कमिटीचे अध्यक्ष, यात्रा विश्वस्त भाविक उपस्थित होते.
यावेळी जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. श्रीरामाच्या दर्शनासाठी काळाराम मंदिर व मेनरोडवरील मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेनिमित्त मेनरोड़च्या दोन्ही बाजूंनी प्रसाद, पान-फुले, मिठाई, खेळण्यांसह विविध वस्तूंचे स्टॉल्स लावल्यामुळे
मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रात्री प्रवरा कॅनालजवळ फटाक्यांसह शोभेच्या दारूची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. श्रीरामपुरात श्रीराम नवमीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करीत, ढोल-ताशांच्या गजरात श्रीराम मंदिरात पाळण्याची दोरी ओढून, श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.श्रीराम नवमी उत्सवाचे आकर्षण असलेल्या थत्ते मैदानावरील रहाट पाळण्यांचे उद्घाटनही विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
