दाढ खुर्द अंबिका यात्रा उत्सव अध्यक्षपदी कारभारी जोशी उपाध्यक्ष अमोल साळवे

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील दाढ खुर्द येथे सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्या नंतर तिसऱ्या व चौथ्या दिवशी ग्रामदैवत अंबिकामाता  यात्रा उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्ताने सर्वानुमते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
                  अध्यक्ष कारभारी जोशी 
येथील अंबिका माता यात्रा उत्सव कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे कमिटी करण्यात आली. कारभारी गोपीनाथ जोशी (अध्यक्ष) अमोल चांगदेव साळवे(उपाध्यक्ष),सतीश कुंडलिक जोशी (प्रशासक ग्रामपंचायत दाढ खुर्द ),संजय रघुनाथ जोशी,

सुरेश भाऊसाहेब जोरी, चेतन संतोष पर्वत, सुनील बाळासाहेब जोशी,अशोक भागवत जोशी,आप्पासाहेब मोहन जोशी, किशोर अशोक जोशी, संपत लक्ष्मण बोऱ्हाडे,अक्षय भाऊसाहेब रकटे,गणेश चंद्रभान जोशी, संदीप नंदू जोरी, तुकाराम नामदेव बोऱ्हाडे, बाबासाहेब बाबुराव वाडगे,

राजेंद्र भाऊसाहेब जमधडे,संजय सोन्याबापू पर्वत,दत्तात्रय विठोबा पर्वत, रामदास भाऊसाहेब पर्वत, विजय राजाराम जोशीज्ञानेश्वर बाळकृष्ण जोरी,अमीर मिरासाहब शेख,ज्ञानेश्वर नामदेव वाडगे,सुरेश दौलत बिरे, डॉ. साईनाथ मनोहर जोशी, डॉ.राजेंद्र सिताराम साळवे, लक्ष्मण तुकाराम माळी,भारत नारायण पर्वत, सोपान भागाजी पर्वत, संदीप भिमराज झनान, ज्ञानेश्वर सुभाष जोशी,भास्कर पोपट वाडगे, गोरक्षनाथ पोपट गिते, तुकाराम लहानू जोशी, सोसायटी अध्यक्ष रामलाल कोंडाजी कहार, सोसायटी उपाध्यक्ष बापु भिका जोशी तुकाराम रभाजी पाबळे (खजिनदार) आदि.सदस्य कमिटी करण्यात आली.

गावातील सर्व मंदिरावर विदयुत रोषणाई करण्यात आली.यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.अंबिका यात्रा उत्सव कार्यक्रमात रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी सायं ६ वाजता मानाची काठीची सुवाद्य व पारंपरिक वाद्य लावून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

त्यानंतर रात्री ९ वाजता मनीषा सिद्धटेककर सोबत रेश्मा नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा, तसेच सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तमाशा हजेरी कार्यक्रम व दुपारी ४ वाजता कुस्तीचा जंगी हगामा आयोजित केला आहे. परिसरातील नामवंत पैलवान उपस्थित राहणार आहे.यात्रा आनंदमय व शांततामय वातावणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दाढ खुर्द ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.                 उपाध्यक्ष अमोल साळवे 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!