महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या फॅशन टेक्नॉलॉजी विद्यार्थिनीचा कलाविष्कार

Cityline Media
0
पुणे प्रशांत निकम पुण्यातील  महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी (सॉफ्ट) तर्फे २१ मार्च रोजी कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे सायं. ७ वा. विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध पोशाखांचे सादरीकरण द डिजाइन शोकेस २०२६ या फॅशन शो मधून केले जाणार असल्याची माहिती सॉफ्टच्या  प्राचार्या डॉ. गरिमा भल्ला यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सॉफ्ट बिझनेस इन्क्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ.सुरेश कराळे आणि प्रा. सत्यजीत जोगळेकर उपस्थित होते.

प्रसंगी डॉ. भल्ला म्हणाल्या की 'डिझाइन शोकेस २०२६' हा कल्पकता, कारागिरी आणि शाश्वत डिझाइनचा एक दिमाखदार सोहळा असणार असून या मधे  १७० हून अधिक उदयोन्मुख वेशभूषाकारांनी बनविलेल्या १४ नाविन्यपूर्ण फॅशन श्रेणीतून शाश्वत फॅशन, पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक डिझाइनचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे.

सॉफ्ट आयोजित या कार्यक्रमातून संस्थेच्या आभूषण, फॅशन आणि आंतरविद्याशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) फॅशन विभागांच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्य सादर केले जाणार असून हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असणार आहे. फॅशन शोची मुख्य संकल्पना 'शाश्वतता' ही आहे.  आभूषण विभागाच्या सादरीकरणा मध्ये भारतीय वारसा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पहावयास मिळेल.पुनर्वापर, त्रिमिती प्रिंटिंग आणि शाश्वत तंत्रांचा वापर करून साकारलेली  नाविन्यपूर्ण श्रेणी हे शो चे खास आकर्षण असणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!