श्रीरामपूर मध्ये २२ मार्चला ख्रिस्ती वधू वर मेळाव्याचे आयोजन

Cityline Media
0
श्रीरामपूर प्नतिनिधी ख्रिस्ती कुटुंबातल्या उपवर मुला मुलींच्या विवाह विषयक समस्या अगदी सोप्या पद्धतीने सोडविण्याच्या उदात्त हेतूने २२ मार्च रोजी सामाजिक उपक्रमांतर्गत भोसले प्रतिष्ठानच्या वतीने श्रीरामपूरातील मेनरोडच्या आगाशे सभागृहामध्ये ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक श्रीधर भोसले यांनी दिली.या सेवाभावी उपक्रमाचे उदघाट्न नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी सूर्या गजभिव,मंगल गायकवाड, दत्ता अमोलिक, शिल्पा सिंग, ॲड.शशिकांत संसारे, संजय साळवे व अमोल कदम मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात राज्यातून सर्व पंथीय अविवाहीत,विधवा,विधुर व घटस्फोटीत उमेदवार येणार आहेत.आलेल्या या संधीचा फायदा घेऊन विवाहच्छूकांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे अवाहन देखील संयोजक श्रीधर भोसले यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!