-कोल्हार भगवतीपुर येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजन
कोल्हार अरुण बोरूडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचा राजा आणि सर्व धर्म समभावाचा आदर्श जगाला दाखविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती कोल्हार बुद्रुक येथील भगवतीपुर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच ॲड.सुरेंद्र खर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचा खरा आदर्श समाजाने घ्यावा.आजकाल काही जण महाराजांचे नाव घेऊन वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला भोगावे लागतात,ही दुर्दैवी बाब आहे.
राजकीय स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी महाराजांच्या नावाचा वापर होऊ नये,असेही त्यांनी सांगितले. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेत रयतेचे राज्य उभारले आणि कुठलाही भेदभाव केला नाही.त्यामुळे समाजातील सर्वांनी एकता,शांतता व बंधुभाव जपत महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी,असे आवाहन यावेळी ॲड खर्डे यांनी केले.
या कार्यक्रमास मा.सरपंच अँड सुरेंद्र खर्डे शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे, कोल्हार बुद्रुक देवालयाचे अध्यक्ष सयाजी खर्डे, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, भरत खर्डे,अजित मोरे,अनिल खर्डे, शामराव गोसावी, संजय शिंगवी, डॉ सुनील खर्डे,
गोरक्षनाथ खर्डे , सुनील बोरुडे, दत्तात्रय राजभोज, केतन लोळगे, ज्ञानेश्वर खर्डे, अनिल हिरानंदानी, प्रशांत काळे,शाम लोखंडे, वसंतराव मोरे, अक्षय मोरे, आबासाहेब राऊत, विजय गोहर, विजय मोरे, संतोष जोर्वेकर, सागर बांगरे, योगेश कोरडे, कादिर अत्तार, सतीश चव्हाण, सचिन नेहे, निलेश खर्डे, धनंजय घोरपडे, सचिन कोळसे, हर्षद मिजगुले, सागर मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
