युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण
लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भावड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण भाजप उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे,पाटील यांच्या हस्ते राहाता तालुक्यातील लोणी येथे झाले.
प्रसंगी लोणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, योगेश आहेर (बंटी) मा.सरपंच अनिल विखे,अभिनेत्री नीता कांबळे,अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित, लेखक अभिनेता ज्ञानदेव शिंदे,अभिनेता पत्रकार ज्ञानेश्वर साबळे,अभिनेता ज्ञानेश्वर मोहिनीराज थोटे,
अभिनेता रज्जाक शेख,ज्येष्ठ अभिनेता लेखक आनंदा साळवे यावेळी उपस्थित होते भावड्या चित्रपटात भावड्याची भूमिकेत प्रमोद पंडित आहे त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने त्यास गावराण बाज आहे ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून यात अनेक नवोदित कलाकारांना भूमिका करण्याची संधी मिळाली असल्याने प्रेक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण असून हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांना मोहिनी घालेल असे बोलले जातेय
