बस प्रवासात डिजिटल खोळंबा; सुट्या पैशांच्या वादाने प्रवासी हैराण

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'लालपरी' अर्थात एसटी बसचा प्रवास सध्या प्रवाशांसाठी एका वेगळ्या अनुभवांची शिदोरी असणारा ठरू लागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या भाड्यात १७.५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना आता खिशाला अधिक कात्री लावावी लागत आहे.मात्र, एकीकडे प्रवास महाग झाला असताना दुसरीकडे महामंडळाची ऑनलाईन युपीआय पेमेंट सेवा अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
आजच्या डिजिटल युगात जवळपास ७० ते ८० टक्के प्रवासी तिकीट काढण्यासाठी फोन-पे किंवा गुगल-पे सारख्या ऑनलाईन सेवांचा वापर करतात, परंतु ऐन वेळी ही सेवा बंद पडल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसत आहे.

गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटची सवय झाल्यामुळे अनेक प्रवाशांच्या खिशात पुरेशी रोख रक्कम नसते.अशा परिस्थितीत प्रवासादरम्यान युपीआय सेवा चालत नसल्याने विद्यार्थी वर्ग आणि महिला प्रवासी,नागरिक यांची मोठी तारांबळ उडत आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही सुट्या पैशांसाठी कसरत करावी लागत आहे.सध्या सर्वच ठिकाणी सुट्या पैशांचा मोठा तुटवडा जाणवत असून,अगदी भाजी मंडई पासून ते मोठ्या बाजार पर्यंत ऑनलाईन व्यवहार सुरू असल्याने नागरिक रोख पैसे सोबत ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. 

मात्र,एसटीमध्ये ही सेवा बंद असल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून खटके उडत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे प्रवासाचा आनंद पूर्णपणे निघून गेला असून कधी कधी वादा वादीचे प्रकार होत आहे 
ऑनलाईन युपीआय सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना केवळ तिकीट काढणेच कठीण झाले नसून,संपूर्ण प्रवासात कुठे पैसे देण्याचा आणि ऑनलाईन पेमेंट बाबत हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

राज्य परिवहन महामंडळ ही सुविधा पुन्हा कधी सुरू करणार आणि सर्वसामान्य प्रवाशांची या त्रासातून कधी सुटका होणार,असा प्रश्न आता जनता विचारत आहे. भाडेवाढ करूनही जर मूलभूत डिजिटल सुविधा मिळत नसतील तर प्रवाशांनी ही अडचण कशी दूर करावी अशी विचारणा होत आहे. ही तांत्रिक अडचण तातडीने दूर करून प्रवाशांना दिलासा द्यावा,अशी मागणी आता सर्वसामान्य प्रवासी वर्गातून केली जात आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!