हिवरगाव पावसा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Cityline Media
0
संगमनेर नितीनचंद्र भालेराव संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य पारंपारिक मिरवणूकीचे आयोजन भीमशक्ती तरुण मित्र मंडळाने केले होते.सायंकाळी ६ वा.भव्य मिरवणुकीने कार्यक्रमास सुरुवात झाली.
मिरवणुकीत तरुण,महिला,ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यानंतर बुध्द विहार येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी भगवान बुद्ध,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बहुजन प्रतिपालक छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज,आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक याच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्रिशरण व पंचशील सामूहिकरीत्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे म्हणाले, बाबासाहेबांनी शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा सांगितले पण बहुजन समाजाने संघटीत व्हा, संघर्ष करा एवढेच स्वीकारले. आज सर्वच समाजाने उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना सहकार्य केले पाहिजे.बहुजन समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेतले तरच स्पर्धेच्या युगात प्रगती करू शकतात. शिक्षणामुळे घराची,समाजाची, देशाची प्रगती होणार आहे.

या कार्याक्रमास सरपंच सुभाष गडाख,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,  संपादक यादवराव पावसे,वृक्ष मित्र प्रा.गणपत सर,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे, शिवसेना तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,बाबुराव पावसे,आप्पासाहेब गडाख,युवा कार्यकर्ते यांच्या सह बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला, बौद्ध बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीनचंद्र भालेराव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ भालेराव,
मन्सूर इनामदार,बाळासाहेब भालेराव,दिपक भालेराव,
विकास दारोळे,हरिचंद्र भालेराव,यादव भालेराव,सागर भालेराव,लहानू भालेराव, चंद्रकांत भालेराव,महेंद्र
भालेराव,

खंडू शेटे,राहुल भालेराव,संजय भालेराव, प्रल्हाद मोकळ,रवी दारोळे,रमेश दारोळे,राजेंद्र दारोळे,
राजेंद्र भालेराव,करण दारोळे, गौरव दारोळे,गणेश दारोळे,शरद भालेराव,मुकेश भालेराव, राजेंद्र रामभाऊ भालेराव,उत्तम गायकवाड,समाधान भालेराव,
सुयोग भालेराव,संतोष भालेराव, मिलिंद भालेराव,राहुल रवींद्र भालेराव,चंद्रकांत संसारे,सागर भालेराव,विशाल भालेराव,हर्षल भालेराव,रोहित भालेराव,उमेश राजेंद्र भालेराव,शरद भालेराव,भीमराज भालेराव,
गौतम भालेराव,चेतन भालेराव,सतीश भालेराव,धनंजय वाघमारे,सुरज भालेराव,बाबाजी हनुमंत भालेराव यांच्या सह भीमशक्ती तरुण मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!