अक्षय कर्डिले हेच राहुरीचे आमदार होणार-ज्ञानेश्वर अहिरे

Cityline Media
0
ज्ञानेश्वर अहिरे यांच्या वक्तव्याने अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग मोकळा

राहुरी प्नतिनिधी राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या मतदारसंघात निर्णायक मतदान असलेला आदिवासी भिल्ल समाज नेमका कुणाबरोबर जाणार या चर्चा रंगल्या असतांना आज एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी अक्षय कर्डिले हेच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होणार असे वक्तव्य केल्याने अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात आदिवासींचे जवळपास ४५ हजार पेक्षा जास्त मतदार आहेत त्यामुळे हे मतदान ज्या उमेदवाराच्या पारड्यात जाईल तोच उमेदवार राहुरी विधानसभेचा आमदार असेल हे गणित निश्चित झाले होते.त्यामुळे हे मतदान नेमके कोणाला पडणार या चर्चेला मतदारसंघात उधाण आले होते.

एकलव्य आदिवासी सेनेने आतापर्यंत कोणालाही जाहीर पाठिंबा न दिल्याने जनसामान्यांची उत्सुकता वाढली होती त्यातच आज एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी अक्षय कर्डिले हेच राहुरीचे आमदार होणार हे विधान केल्याने चर्चेना पूर्णविराम मिळाला आहे.

त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जाहीरपणे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.यावेळी पुढे बोलताना श्री.अहिरे  म्हणाले, की दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांना एकलव्य आदिवासी सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे मार्गी लागली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्या निधनाने मतदार संघात कामे स्थिरावले लागले अक्षय कर्डिले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निश्चित अधुरी असलेली कामे पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे.

ज्ञानेश्वर अहिरे यांच्या वक्तव्याने अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असला तरी इतर उमेदवारांच्या गोठात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या राहुरी मतदार संघात पोट निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे त्यातच ज्ञानेश्वर अहिरे यांच्या वक्तव्याने निवडणूक एका बाजूने झुकते की काय?अशी चर्चा रंगली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!