लोणी रुपाली भालेराव मराठी चित्रपटसृष्टीत मोठा धमाका भक्ती,भावना आणि सत्याचा जबरदस्त संगम असलेली एन.पी व्हिजन फिल्म्स लवकरच घेऊन येत आहे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी श्री स्वामी समर्थ प्रचिती हि मराठी शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्य भेटीला येतेय.
जिथे विज्ञान थांबते तिथे सुरू होते श्रद्धेची प्रचिती असा आशय घेऊन सत्य घटनेवर आधारित असलेली ही भव्य मराठी फिल्म सध्या जोरदार चर्चेत असून,नुकतंच याचं शूटिंग पूर्ण झालं आहे.आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी ही फिल्म सज्ज झाली आहे असल्याची माहिती
निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ही फक्त शॉर्ट फिल्म नाही हा अनुभव आहे! प्रेक्षक सिनेमा गृहातून,स्क्रीन समोरून बाहेर पडताना भारावून जातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू असतील,तर अनेकांच्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होईल!
अशी एका सर्वसामान्य माणसांची असामान्य कथा!
एकीकडे पुणतांबा येथे स्वतःचे मेडिकल चालवणारे प्रमोद निर्मळ तर दुसरीकडे पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करणारे आबा निर्मळ या दोघांनी मिळून स्वप्न पाहिलं… आणि ते थेट पडद्यावर साकारलं!
मर्यादित साधनं, पण अमर्यादित जिद्द! या टीमने कोणत्याही मोठ्या बॅनरशिवाय,स्वतःच्या मेहनतीवर आणि श्रद्धेच्या बळावर ही फिल्म उभी केली आहे.
हाच तिचा खरा अर्थ आहे! या चित्रपटात
प्रमोद निर्मळ, ज्ञानेश्वर थोटे (नेवासा), मनीषा गुळवे, ज्ञानेश्वर साबळे,नरसिंम्हा ताक,वनिता निर्मळ, सुरज बी निर्मळ आणि संजय निर्मळ (संजू बाबा) या कलाकारांची दमदार फौज असून त्यांनी आपल्या अभिनयाने या कथेला जिवंत केलं आहे.
का पाहावी ही फिल्म सत्य घटनेवर आधारित थरारक कथा मनाला भिडणारा भावनिक प्रवास स्वामी समर्थांच्या चमत्कारांची अनुभूती प्रत्येक भक्तासाठी एक आध्यात्मिक मेजवानी सोशल मीडियावर आधीच चर्चा सुरूही फिल्म गेम चेंजर ठरणार
मराठी सिनेमाला नवी दिशा देणारा प्रयत्न!”श्रद्धा आणि वास्तवाचा अप्रतिम मिलाफ!”तयार राहा… कारण ही फिल्म फक्त पाहायची नाही, तर अनुभवायची आहे!अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.एन.पी. व्हिजन या युट्युब चॅनलवर“श्री स्वामी समर्थ प्रचिती तुमच्या मनात श्रद्धेची नवी ज्योत पेटवणारी कथा!बघायला विसरू नका असे आवाहन निर्माते दिग्दर्शकांनी केले
