लोणीच्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाचे सुयश

Cityline Media
0
२४ विद्यार्थी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र

लोणी रुपाली भालेराव राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील रयत शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय,या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपली देदीप्यमान परंपरा कायम राखत सन २०२५-२६ च्या इयत्ता ८ वी च्या एन.एम.एम.एस.परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी या अत्यंत मानाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले असून, या विद्यार्थ्यांनी एकूण १,१५,२०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'गुणवत्ता विकास हाच आमचा ध्यास' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून विद्यालयाने या परीक्षेसाठी केलेल्या नियोजित तयारीमुळे हे यश साध्य झाले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गायकवाड सार्थक महेश (१५८ गुण), रासकर आनंद विजयकुमार (१५७ गुण), कु. मगर साईशा मच्छिंद्र (१५५ गुण), काळे कृष्णा बाबासाहेब (१५४ गुण), कुलकणी हर्ष चंद्रशेखर (१४७ गुण), कु.खर्डे अक्षरा सुदाम (१४० गुण), चोपडे साई अतुल (१३५ गुण), 

कु. गांगुर्डे अनुष्का अशोक (१३४ गुण), कु. वर्ष ईश्वरी मनिष (१२८ गुण), कु. बटुळ समृद्धी महाराष्ट्र (१२७ गुण), कु. ईंधाटे गायत्री गणेश (१२४ गुण), कु. कांगुणे संस्कृती सचिन (११५ गुण), दिघे समर्थ राजेंद्र (११३ गुण), लहामगे राज प्रविण (१११ गुण), कु. गोर्डे तन्वी संपत (१११ गुण), 

नाईक वेदांत संदिप (१११ गुण), शेंडे ओम शिवानंद (१११ गुण), कु. काळे सेजल बाबासाहेब (११४ गुण), कु. भालके त्रिवेणी अविनाश (११६ गुण), गुळवे अभिनव नवनाथ (११८ गुण), कु. गडे ईश्वरी संजय (११९ गुण), जगताप प्रथमेश राहुल (१११ गुण), ड़ुणे साई संदिप (११० गुण) आणि खर्डे सिद्धांत सचिन (१११ गुण) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशात प्राचार्य. रक्टे एल.सी रक्टे  उपप्राचार्य. एस.एस. डहाळे पर्यवेक्षिका श्रीमती कडू आणि पर्यवेक्षक भुसाळ एस.एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक शिक्षक विभागप्रमुख  पवार आर.सी. यांच्यासह  भांबरे एच.पी., 

अंत्रे के.आर.सौ.कदम ए.एस.,श्रीम. ढोकणे पी.डी., श्री. जाधव एन.डी. आणि शिंदे यु.के. यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळेच हे यश शक्य झाले आहे.या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक मीना जगधने विश्वस्त एकनाथ घोगरे ,

उत्तर विभागीय अध्यक्ष आशुतोष काळे विभागीय अधिकारी श्री.बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी सन्माननीय श्री.तोरणे आणि श्री. नाईकवाडी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब के. विखे पाटील, सरपंच जनार्दन घोगरे , सल्लागार मंडळाचे  उत्तम आहेर आणि कृषीभूषण सन्माननीय सौ.प्रभावती घोगरे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. लोणी परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि पालकांनी 'आपले विद्यार्थी आपला अभिमान' अशा शब्दांत या यशाचा गौरव केलाआहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!