लोहगाव कोंडीराम नेहे राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोनेतारण कर्ज सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती .शाखा अधिकारी सौ.अपेक्षा जोंधळे.यांनी नुकतीच दिली आहे.
प्रति तोळा जास्तीत जास्त कर्ज व कमीत कमी व्याजदरात तसेच कमीत कमी कागदपत्रात खातेदारांना ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी एक टक्का व्याजात सुट देणार असल्याचे.त्यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेत ही सुविधा सुरू झाली आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. या योजनेमुळे शेतकरी व परीसरातील नागरिकांनी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे. संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचे अभिनंदन केले.
