सौ.नंदिनी भिमराज वाघमारे यांच्या सेवापुर्ती व अभिष्टचिंतनातून प्रबोधनाचा एल्गार

Cityline Media
0
महाराष्ट्र दिनी लोणीत रंगणार सामाजिक कवितांची मैफिल

लोणी रुपाली भालेराव राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत गत ३७ वर्षापासून कार्यरत असलेल्या सौ.नंदिनी भिमराज वाघमारे यांच्या सेवापूर्ती व ६० व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन लोणी येथे १ मे महाराष्ट्र दिनी करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध कवी व शेतकरी नेते संदीप जगताप हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. संदीप जगताप यांच्या कविता या रसिकांसाठी एक मांदियाळीच असणार आहेत. जागर माता अन् मातीचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी.
अध्यक्ष.सौ.शालिनीताई विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,
रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील व प्राचार्य डॉ.अनुश्री खैरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.लोणी येथील ओम गुरुदेव मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व शेती- मातीच्या कवितांचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वाघमारे परिवार व कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!