अकोले तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असणारे येथील ज्येष्ठ नेते सुरेश भिकाजी देठे अकोले तालुक्यातील कळंब येथे जन्म १ जुन १९६४ साली एका गरीब कुटुंबात मुंबई (भायखळा) येथे जन्म झाला ! आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने थोडेसे..
सुरेश देठे यांचे वडील मुंबई येथे मिटलबाॅक्स कंपनीत कामगार म्हणून कामाला होते !
नंतर ती कंपनी बंद झाली व आई वडील सर्व परिवाराला घेऊन गावी आले यावेळी सुरेश देठे ५ वर्षांचे होते! १९७२ साली दुष्काळ पडला होता.
सर्व परिवाराला मामाकडे अकोल्याला घेऊन आली आणि इथे मोलमजुरी करून कुटुंब सांभाळले नंतर सुरेश देठे यांच्या मामीने त्यांना शाळेत घातले तिथेच इयत्ता १० पर्यंत शिक्षण झाले १९८२ साली त्यांचा मंगल परिणय अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक गावातील सामाजिक चळवळीत योगदान असलेले व कलाक्षेत्रात मोठे नाव असलेले शंकर शिंदे यांची कन्या मंदा यांच्याशी झाला!
लग्नानंतर अकोले शहरात सन १९८४ ला सायकल दुकान टाकले !सुरेश देठे यांच्या सामाजिक राजकीय योगदान निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा वाटा राहिला तो.सौ. मंदा यांचा कारण देठे साहेब चळवळीत योगदान देत असताना त्यांनी घरची सर्व जबाबदारी निमुटपणे सांभाळली सुरेश देठे यांना तरुण वयात समाज कार्याची आवड होती!
हे सामाजिक चळवळीचे बाळकडू त्यांचे मेहुणे तत्कालीन आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते शशीकांत शिंदे यांच्या कडून त्यांना मिळाले होते!दरम्यानच्या काळात मा. आमदार पी.जे रोहम यांचे चिरंजीव मा. सनदी अधिकारी सुधाकर रोहम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चळवळीत प्रवेश केला.
त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा मान्यता प्राप्त एकच पक्ष होता या पक्षाचे सभासद होऊन अकोले तालुक्यात रिपब्लिकन चळवळीचे काम सुरेश देठे यांनी जोमात सुरू केले कारण या पक्षाची धुरा त्याकाळी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रा. सू.गवई सांभाळत होते.
त्यांच्या आदेशाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समावेत योगदान असलेले पी. जे. रोहम यांचे चिरंजीव सुधाकर रोहम यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली यासाठी नेहमी सुरेश देठे सुधाकर रोहम यांच्याबरोबर प्रत्येक क्षणी विविध संघटना बांधणीसाठी उभे राहिले फुले शाहू आंबेडकर चळवळ अकोले तालुक्यात खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी सुधाकर रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश देठेंनी संपूर्ण अकोले तालुका पदक्रांत केला.
चळवळीत मानापेक्षा समस्या जास्त असायच्या म्हणून ते स्वतः घरची शिदोरी घेऊन चळवळ भक्कम करण्यासाठी जिल्हाभर सुधाकर रोहम यांच्याबरोबर फिरले व लोकांच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला.
अर्थातच तेव्हापासून आजपर्यंत संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत ज्यांचे मोठे योगदान होते असे ते मा. आमदार पी.जे. रोहम यांचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीचे भुषण रिपाइं नेते लोकनेते सुधाकर रोहम यांच्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात काम करायला सुरुवात केली!
सामाजिक चळवळीत योगदान देताना त्यांनी शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पद उपभोगले यावेळी या पदाचा वापर गोरगरीब जनतेच्या हितासाठी अकोले तालुक्यातील अडीअडचणी असलेल्या आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी केला.
व त्यांनी आपल्या सायकलच्या दुकानातच छोटे खाणी कार्यकर्त्यांसाठी एक कार्यालय सुरू केले आणि या ऑफिसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा केला अकोले तालुक्यामध्ये कोठेही काही समस्या असो सुरेश देठे सर्वात अगोदर त्या ठिकाणी उपलब्ध असतात.
अकोल्यातील चळवळीतील जनसंपर्क असणारा व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश देठे चळवळीत काम करताना आपल्या मितभाषी व आनंददायी स्वभावाने इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची खुबी व समस्या सोडवण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्याचे कौशल्य सुरेश देठे यांच्याकडे पहावयास मिळते.
सुरुवातीच्या काळात मोटरसायकल वरती प्रवास करीत असताना चळवळीत काम करताना त्यांना अपघात झाला व पायाला गंभीर दुखापत होऊन पायाचे हाड मोडले तरी सुद्धा ते क्षणभरही थांबले नाही त्यांनी चळवळ चालूच ठेवली काही दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या आदेशाने काही काळ सुरेश देठे यांना अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.
याकाळात चळवळ बांधणीसाठी देठेंनी स्वतःपदर मोड करून संपूर्ण जिल्हा भ्रमंती करून पक्ष संघटना मजबूत केली या कार्यात त्यांना अकोले तालुक्यातील चळवळीचे खंबीर समर्थक शिलेदार राजेंद्र घायवट विष्ण हरनामे
शंकर जगधने सोमनाथ हरनामे गोरख शिरकांडे मारुती सोनवणे सखाराम कदम बन्सी कदम आव्हाड संतोष संगारे प्रकाश देठे किरण देठे सुभाष देठे सुधीर रूपवते दिनकर बर्वे भाऊसाहेब निळे कवी अशोक शिंदे तुकाराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यानच्या काळात त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उतर महाराष्ट्र अध्यक्ष पद मिळाले होते त्यावर आजही ते कार्यरत आहेत सध्या ते भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संघटक म्हणून काम करत आहे ही आंबेडकरी चळवळ चालवताना अनेक चढउतार अनुभवायास मिळाले पण निराश न होता सामाजिक व कौटुंबिक अनेक समस्या असताना सुद्धा कणखरपणे चळवळीसाठी योगदान देण्याचे काम सुरेश देठे करत आहेत.
त्यांच्या परिवारात तीन मुले एक कन्या असा सुंदर परिवार आहे कन्येचे लग्न झाले असून सुस्थितीत आहे प्रवीण आणि नितीन व संतोष हे कौटुंबिक कार्य करत असतानाच सामाजिक कार्य करण्यात आघाडीवर आहेत अकोले तालुक्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रथम आवाज उठवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वाकचौरे रमेश अण्णा जगताप यांच्या बरोबर सुरेश देठे यांच्या संपर्कात झाले असावी.
ही न विसरणारी बाब आहे महामानवाच्या स्मारकासाठी संपूर्ण अकोले तालुक्यातील मान्यवरांना एकत्र करण्याचे कौशल्य सुरेश देठे यांच्याकडे आहे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आयोजित केलेल्या मोर्चात महाराष्ट्र राज्याचे नेते विजय वाकचौरे रमेश अण्णा जगताप यांच्याबरोबर सुरेश देठे योगदान होते त्यांचे दोनही चिरंजीव प्रवीण आणि संतोष या मोर्चाच्या नियोजनासाठी आघाडीवर होते हेही विसरून चालणार नाही.
आजही वयाच्या ६२ वी पार करत करत असताना एखाद्या तरुणाला लाजवेल असेच काम सुरेशराव देठे यांच्याकडून होत आहे कारण जर आपण अकोले तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षाचा महामानवाच्या जयंतीचा विचार केला तर आहे.
त्या परिस्थितीत लोकांसाठी योग्य वेळी उपलब्ध असणार व्यासपीठ म्हणजे सुरेश देठे आहेत कोणत्याही गावात जयंती कार्यक्रम असो आवर्जून उपस्थितीत राहण्याची त्यांची तळमळ पहावयास मिळते काही वेळेस साधन मिळत नाही अशा वेळेस त्यांचं मन खिन्न होतं व ते कार्यकर्त्यांना त्याची व्यथा बोलून दाखवतात.
आज त्यांना स्वतःच्या बाईकवर प्रवास करता येणे शक्य नसलं तरी कोणीतरी साथीदार घेऊन ते जयंतीच्या कार्यक्रमासाठी सर्व तालुकाभर फिरत असतात संगमनेर तालुक्यातील त्यांचा बराचसा गोतावळा व मित्रपरिवार आहे आणि त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात देठे साहेब नेहमी उपस्थिती दाखवत असतात.
असे हे बहुआयामी नेतृत्व आज ६२वर्षे पूर्ण करून वयाच्या ६३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत सामाजिक कार्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा जपण्याचं व अनुभवण्याचा काम नुकतेच महाराष्ट्राची रिपब्लिकन पक्षाची ज्येष्ठ नेते विजय वाकचौरे यांनी अनेक मान्यवरांना घेऊन नेपाळ दर्शन व भारतातील विविध बौद्ध संस्कृतींना भेटी देऊन इतिहास समजून घेतला यामध्येही देठे विजय वाकचौरे बरोबर होते.
त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल त्यांना विविध सामाजिक संस्थेंना विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे भारतीय बौद्ध महासभेच्या समाजभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे अशा या बहुआयामी नेतृत्वास भावी आयुष्याच्या निरोगी व मंगलमय हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन
रमेश रुपवते संगमनेर
