ओझर नगरपरिषदेचा शिर्डी अभ्यास दौरा उत्साहात
नाशिक दिनकर गायकवाड ओझर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा तसेच सर्वपक्षीय नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत नुकतेच शिर्डी येथील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
शिर्डी नगरपरिषदेच्या १०० टक्के ओला-सुका कचरा वर्गीकरण,उत्कृष्ट स्वच्छता व्यवस्था, आरोग्य विभागाचे नियोजन व आधुनिक प्रकल्पांची सर्वांनी प्रशंसा केली.
ओझर शहर अधिक स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,
आरोग्य अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले
अभ्यास दौऱ्यात गटनेते सुनील कदम नगरसेविका माया सुरेश काळे नगरसेविका दिपाली शिंदे नगरसेवक रोहित लबडे
नगरसेवक वृषाल पगारे नगरसेवक जय जाधव सहभागी झाले होते
