नाशिक दिनकर गायकवाड गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे या प्रमुख मागणीसाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येणार आहेत.
दुपारी ४ वाजता होणाऱ्या या आंदोलन दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी अजिज पठाण यांनी दिली. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भूमिका संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
