नाशिक दिनकर गायकवाड सामान खरेदीसाठी गाडीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत पाठी मागून मोटार सायकली वरून आलेल्या चोरट्याने बळजबरीने खेचून नेल्याची घटना काठे गल्लीत घडली.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी विद्या मनोज नाशिककर (रा. महावीरनगर, सिंहगड रोड, पुणे) या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास काठे गल्लीतील बनकर चौकातून सामान खरेदीसाठी गाडीवरून जात होत्या.
त्यावेळी बनकर चौकात इडली पीठ विक्रीच्या दुकानासमोर आल्या असता पाठीमागून लाल रंगाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या अज्ञात इसमाने फिर्यादीच्या गाडीजवळ स्वतःच्या गाडीचा वेग कमी करीत फिर्यादीच्या गळ्यात असलेली १२ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.
