झरेकाठी सोमनाथ डोळे लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही ज्ञान,संस्कार आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपणारी संस्था असून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त सेवकांचा तसेच पी एच.डी.पदवी प्राप्त शिक्षकांचा संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या जिद्द,कठोर परिश्रम, चिकाटी आणि कर्तृत्वाचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.संदीप म्हस्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वनस्पतीशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान केली आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सेवक व पीएच.डी. धारक शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील तसेच सहसचिव भारत घोगरे यांच्या हस्ते डॉ. म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.शेळके, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ.संदीप म्हस्के यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
