सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगचे अवैद्य धान्य मुदृदेमालासह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगरची कारवाई

झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील पाच महिन्याचा रेशनिंग घोटाळा उघडकीस आला  असताना राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथे नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठा रेशनिंग अवैध साठा मुद्देमालासह आरोपीस जेरबंद केल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती घेत कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत नुकतेच पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे,स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांना राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ गावचे 

शिवारात इसम नामे यासिर सादिक तांबोळी रा.सोनगाव सात्रळ हा. रेशनिंगचा गहु व तांदुळ विक्रीकरीता साई बालाजी फर्निचर शेजारी एका पत्र्याच्या गोडावुन मध्ये साठवुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली.

पो.नि. संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अतार यांचे पथक तयार करुन त्यांना खबरीची हकिगत समजावुन सांगुन कारवाई करणे कामी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

त्यानंतर पथक खबरीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता एक इसम गोडावुन मध्ये बसलेला दिसला.तेव्हा पथकाने या ठिकाणी छापा टाकुन एक इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव १) यासिर सादिक तांबोळी वय- २६ वर्षे रा. सोनगाव सात्रळ असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसम समक्ष या गोदामाची पाहणी केली असता गोडावुनमध्ये दोन वाहने व गोण्यामध्ये भरलेले तांदुळ व गहु दिसुन आले.ताब्यातील इसमाकडे सदर गहु व तांदुळ याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गहु व तांदुळ हे आजुबाजुचे रेशनिंग दुकानामधुन काळ्या बाजाराने खरेदी केले असल्याचे सांगितले.

ताब्यातील आरोपीचे व घटनास्थळावरुन २,०९,७०० रुपये कि.च्या ६९९० किलो ग्रॅम वजाचे गव्हाने भरलेले १२१ गोण्या, २,९३,०००रुपये कि.च्या ५७६० किलो ग्रॅम वजनाचे तांदुळाने भरलेल्या ११७ गोण्या, ७,००,००० रु कि.चे दोन वाहने असा एकुण १२,०२,७०० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असुन वरील आरोपी विरूध्द राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७१३/२०२६ जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!