तांभेरे येथे ४५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन ‌आत्महत्या

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शेलार वस्तीवर राहणाऱ्या ४५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेतील सुनील शहाजी शेलार असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेने तांभेरे परिसरात अनेकांनी शोक व्यक्त केला.शनिवार सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांनी शेलार वस्ती जवळ आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने एक व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह सुनील शहाजी शेलार यांचा असल्याचे स्पष्ट झाले.घटनेची खबर तातडीने त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली, माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आई, पत्नी,मुलगा आणि मुलाने केलेला आक्रोश पाहून उपस्थित नागरिक गहिवरले.

काही दिवसापूर्वी सुनील  शेलार यांच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर घरातला करता माणूस असे  टोकाचे पावले उचलल्याने कुटुंबियांवर मोठा  आघात झाला आहे सुनील शेलार यांनी आत्महत्या का? केली,याचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच 
राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मृत सुनील शेलार यांच्या पाश्चात आई पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे तांभरे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी बाबासाहेब शेळके बागुल करत आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!